Useful Apps

व्हाटसअॅपवर कलरफुल फॉन्ट कसे वापरावे?

fancy-text-generator-for-whatsapp-guid-in-marathi

 

व्हाटसअॅपवर टेक्स्ट फॉर्मेटींग अर्थात अक्षर *बोल्ड* / _इटालिक_ / ~स्ट्राइकथ्रू~ करण्याची सुविधा उपलब्ध आहे. आता अनेक थर्ड पार्टी अॅप्स याहून पुढे जात आकर्षक व कलरफुल फॉन्ट वापरण्याची सुविधा देत आहेत. या अॅप्सच्या मदतीने अधिक आकर्षक मेसेज पाठवणे शक्य होणार आहेत. थर्ड पार्टी अॅप असल्याने यात मोठ्या प्रमाणावर जाहिराती ओपन होतात. त्यामुळे थोड इर्रिटेटेड होत. गरज नसेल तेव्हा हे अॅप फोर्स क्लोज करणे आवश्यक आहे.

खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही कलरफुल फॉन्ट वापरू शकतात.

१. प्ले स्टोरवरून Fancy Text Generator Pro #FREE हे अॅप डाऊनलोड करा.

fancy-text-generator-pro-free-app-guid-in-marathi

२. अॅप ओपन केल्यावर इनपुट टेक्स्टमध्ये तुम्हाला हवे ते टाईप करा.

३. खाली वेगवेगळ्या २० फॉन्टसमध्ये तुम्ही टाईप केलेला मजकूर दिसेल.

४. त्यावर केवळ एक क्लिक केल्यावर तो मजकूर क्लीप बोर्डवर कॉपी होईल. यानंतर तुम्हाला हव्या त्या ठिकाणी ते पेस्ट करा.

यानंतर तुमचे काही प्रश्न असल्यास कॉमेंट करू शकता. धन्यवाद!

About the author

तुषार महेश भांबरे

सध्या 'जनशक्ति'च्या डिजिटल आवृत्तीसाठी काम पाहतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स, सोशल मीडिया व तंत्रज्ञानाची विशेष आवड.

तुमची प्रतिक्रिया द्या