Blogging Featured

वर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा?

how-to-start-blog-on-wordpress-in-marathi

या लेखात wordpress.org वर ब्लॉग कसा तयार करावा याविषयी माहिती घेणार आहोत.

सध्याच्या युगात लोकांना व्यक्त होण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. यात सोशल मीडिया खालोखाल ब्लॉगिंग हे सर्वात प्रभावी व सोपे माध्यम आहे. या आधीच्या लेखात आपण ब्लॉगर वर्डप्रेस की ब्लॉगर? याविषयी सविस्तर माहिती घेतली आहेच. ब्लॉगरपेक्षा मला स्वत:ला वर्डप्रेस जास्त उजवे वाटत असल्याने मी जास्तीत जास्त त्यावरच लिहणार आहे. या लेखात wordpress.org वर ब्लॉग कसा तयार करावा याविषयी माहिती घेणार आहोत.

आधी सांगितल्याप्रमाणे वर्डप्रेसवर ब्लॉग तयार करण्यासाठी आपल्याला होस्टिंग व डोमेन खरेदी करावे लागते. सर्वसाधारणपणे डोमेन + होस्टिंग मिळून वर्षाला ३,५०० रुपयांपासून खर्च येतो. इतका खर्च करण्याची इच्छा नसेल तर blogger.com देखील चांगला पर्याय आहे.

मार्केटमध्ये १ रुपये दिवसापासून १००० रुपये प्रती दिवस किंमत असणाऱ्या अनेक होस्टिंग आहेत. परंतु आजवरच्या माझ्या अनुभवावरून होस्टिंगसाठी BlueHost हा एक चांगला व स्वस्त पर्याय आहे. होस्टिंग घेत असतांना त्याच्या किंमतीबरोबरच डिस्क स्पेस, ब्रांडविड्थ, लोकेशन, सीडीएन आदी गोष्टी देखील चेक करण गरजेच आहे. डोमेन व होस्टिंग विकत घेण ई-कॉमर्स साईट्सवरून शॉपिंग करण्याइतकच सोप आहे. खाली काही स्क्रीनशॉटसद्वारे होस्टिंग कशी विकत घ्यावी हे तुम्हाला लक्षात येईल. जर तुम्हाला इतके कष्ट घ्यायचे नसतील तर नाममात्र शुल्क घेऊन आम्ही हे सर्व सेटअप तुम्हाला करून देऊ. अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा www.techdrift.in

जवळपास सर्वच होस्टिंग कंपन्यांची प्रोसेस सारखीच आहे. मी खाली ब्लूहोस्टची प्रोसेस दाखवणार आहे.

१. www.bluehost.in वर गेल्यावर Great Deals या टॅबवर क्लिक करा. येथे तुम्हाला काही नवीन ऑफर असल्यास स्वस्तात होस्टिंग भेटू शकते.

२. सर्वात आगोदर होस्टिंगसाठी प्रायमरी डोमेन सिलेक्ट करावे लागेल. BlueHost अनेकदा पाहिल्यावर्षासाठी डोमेन फ्री देते.

bluehost_hosting_domain_purchase_process

३. सर्वसाधारण ई-कॉमर्स साईटसारखी पेमेंट प्रोसेस केल्यावर तुमच्या डॅशबोर्डमध्ये होस्टिंग व डोमेन अॅड होईल.

४. होस्टिंगचा डॅशबोर्ड ओपन करण्यासाठी Manage Web Hosting यावर क्लीक करा.

५. यानंतर Softaculous Apps Installer वर क्लीक करा. यानंतर तुमचे डोमेन सिलेक्ट करून इंस्टालवर क्लीक करा.

bluehost_wordpress_hosting_dashboard

बस झालं. तुमचा वर्डप्रेस ब्लॉग रेडी.

यानंतर काही अडचण असल्यास कधीही निसंकोच मेसेज करा. धन्यवाद!

About the author

तुषार महेश भांबरे

सध्या 'जनशक्ति'च्या डिजिटल आवृत्तीसाठी काम पाहतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स, सोशल मीडिया व तंत्रज्ञानाची विशेष आवड.

तुमची प्रतिक्रिया द्या