माझ्या बद्दल

नमस्कार,

मी तुषार महेश भांबरे. मूळचा जळगावकर असून सध्या जॉब निमित्त पुण्यात स्थायिक झालो आहे. बी.कॉम. नंतर पत्रकारितेत पोस्ट ग्रॅड्युएशन पूर्ण करून सध्या एमबीए सुरु आहे. पत्रकारितेची सुरवात जळगावातील ‘साईमत‘ या सायंदैनिकापासून केली. तिथं शेखर पाटील सरांमुळे पहिल्यांदा वर्डप्रेसवर काम करण्याची संधी मिळाली. सध्या ‘जनशक्ति‘ च्या डिजिटल आवृत्तीचे पुण्यातून काम पाहतोय. आवड म्हणून Mission MPSC, टेकवार्ता यासारख्या काही वेबसाईटची निर्मिती केली आहे.

या ब्लॉगच्या माध्यमातून वर्डप्रेस, नवीन तंत्रज्ञान याविषयी मराठीतून जास्तीत जास्त लिहण्याचा प्रयत्न असेल. धन्यवाद!